Ticker

6/recent/ticker-posts

शिवजयंती सजावट स्पर्धेचे मानकरी यवतमाळ येथील पो.उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे यांचा सपत्नीक सत्कार

 


शिवकालीन सेनानी कान्होजी जेधे यांचे १४ वे वंशज युवराज दादा जेधे, तसेच विर हैबतराव शिळीमकर यांचे १४ वे वंशज मंगेशदादा शिळीमकर यांचे कडून सन्मान

Wanitoday

प्रतिनिधी

यवतमाळ :-  दि.१९/२/२०२४ रोजी राज्य स्तरीय घरगूती शिवजयंती सजावट स्पर्धा ." शिवराय मनामनात , शिवजयंती घराघरात " संकल्पना डॉ. तुषार देशमुख, चांदूर बाजार , यांच्या अथक परिश्रमाने आज दि.१६/३/२०२४  रोजी स्थळ -कांचण रिसार्ट हाँल ,अमरावती येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरणाचे प्रमुख अतिथी शहाजी राजे ते शिवरायांच्या स्वराज्याचे स्वराज्य सेनानी, कान्होजी जेधे व वीर हैबतराव शिळीमकर, यांचे वंशज युवराजदादा जेधे, व मंगेशदादा शिळीमकर , सुप्रसिद्ध वक्ते तथा शिवचरित्र अभ्यासक प्रा. प्रविण देशमुख, यवतमाळ, युवा व्याख्याते निलेश सोनटक्के, यवतमाळ, सूबोध धुरंधर अमरावती, जिवन गावंडे अकोला, प्रमुख वक्ते सिमाताई बोके अंजनगाव सुरजि, या मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. तसेच पोलीस उपनिरीक्षक पांडुतात्या कवरासे व त्यांची पत्नी वंदना कवरासे, मुले अनिकेत, दिगवीजय यांनी सन २००७ पासून शिवजयंती उत्सव सुरु केला. व त्यांनी आजपावेतो यवतमाळ जिल्ह्यात घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेत बक्षिसे पटकावली आहे. व त्यांनी आज पर्यंत शाळेतील विध्यार्थी यांना शिवरायांच्या चरीत्राबद्दल माहिती देवून शिवाजी कोन होता.?, शिवरायांचे निष्टावंत मुस्लिम सैनिक, राष्ट्रमाता जिजाऊ, शिवरायांचा स्त्री विषयक दुष्टिकोन, असे एकूण १०० पुस्तके वाटप करून शिवरायांचे विचार व कार्य समाजात पेरण्याचे काम केले. शिवरायांच्या आज्ञापञानुसार त्यांनी आज पावेतो परिसरात ३५० झाडांचे वुक्षारोपन करून संवर्धन व संगोपन करून झाडे जगविली.पर्यावरण राखण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा यथोचित मान  सन्मान करण्यात आला. स्वराज्य सेनानी कान्होजी जेधे ,यांच्या वंशाच्या हस्ते सत्कारामुळे भारावून जावून क्रुतज्ञता व्यक्त केली. अभिमानाने छाती फुलून आल्याचे वार्तालाप करून सांगितले त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.