Ticker

6/recent/ticker-posts

सामान्यातील अति सामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रत्नाकर बनसोड - डॉ. अजय यावले

 

शिक्षणाच्या बळावर ज्यांनी घेतली उतुंग ऐतिहासिक भरारी

News Today

प्रतिनिधी

 अमरावती :-  जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले फक्त शिक्षणासाठीच प्रसिद्ध नसून सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे. सामन्यातील सामान्य व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ओळख आहे.  गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना अहोरात्र वाटेल त्या ठिकाणी मदत करणारे डॉक्टर रत्नाकर बनसोड हे एक उतूंग ऐतिहासिक भरारी घेणारे अमान्य व्यक्ती असल्याचे मत अमरावती येथील डॉ. अजय यावळे यांनी व्यक्त केले आहे. 

डॉ. बनसोड याणा यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये आचार्य ही पदवी मिळाली. त्यांनी अथक प्रयत्न करू गरिबीवर मात करून ही पदवी मिळवली. ही पदवी त्यांना दिल्लीचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या समक्ष देण्यात आली. या त्यांच्या अलौकिक कार्यामुळे समाजातील प्रत्येक स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे. असे ही डॉ. यावले म्हणाले.


यावेळी डॉ बनसोड म्हणाले की, ज्या परिस्थितीत शिक्षण घेतले ते शिक्षण घेऊन आचार्य पदवी पर्यंत पोहोचणे ही मजल सोपी नाही.  या माझ्या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचा माझ्या पत्नीचा माझ्या मुलांचा तसेच माझ्या गुरुजनांचा फार मोठा सिहाचा वाटा आहे. समाजामध्ये काम करत असताना मी फक्त समाजाचं हित कसं होईल याचाच नेहमी विचार करत आलो आणि विचार करत राहील. माझा पहिला जो केंद्रबिंदू आहे तो आहे प्रत्येक समाजातील सुशिक्षित बेरोजगार वर्ग. ज्या वर्गाला मला योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या उपजीविकेचे साधन मिळाले पाहिजे याच उद्देशाने मी सर्व तरुणांशी जुळून आहे आणि जुळूनच राहील. प्रत्येक समाजातील मान्यवर व्यक्ती येऊन माझा सन्मान करत आहे. ही गोष्ट जरी माझ्यासाठी फार आनंदाची असली तरीही माझ्यासाठी प्रत्येक समाजातील तरुणाला कायद्याचं ज्ञान असले पाहिजे यासाठी मी जास्त कार्यरत आणि आनंदी आहे. म्हणून मी जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील बाहेर सुद्धा प्रत्येक गावोगावी जाऊन कायद्याचं ज्ञान गावातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला कसं पोहोचेल याचा प्रयत्न करत आहे. असे डॉ. बनसोड मनोगत यांनी व्यक्त केले.