Ticker

6/recent/ticker-posts

वणीत सां.बा. विभागाच्या उपअभियंत्याला जिवंतपणी अर्पिन केली श्रद्धांजली

 

वंचितचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन

News Today

प्रतिनिधी

वणी :- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंते संजय कुतारेकर यांना त्यांच्या कार्यालयातच वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात व जिल्हामहासाचिव मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अनोखे आंदोलन आज ता. ७ रोजी दुपारी २ वाजता करण्यात आल्याने या आंदोलनाची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.

चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रेल्वे गेट पर्यंतचा रा. मा. ३१५ चे कोंक्रेटी कारण काम सुरू असून त्या कामाच्या निविदेत कंत्राटदार यांना स्वमालकीचा आर.एम.सी. प्लांट, सॅन्ड वॉश प्लांट, चिलींग प्लांट पाहिजे आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराने सदरचे प्लांट कुठे उभारले आहे. ते प्लांट दाखविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी ता. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्र देवून विनंती केली आहे. 

परंतु आज पावतो तो प्लांट दाखविण्यात आलेला नाही काँक्रेटी करणाचे काम अंतिम टप्यात आले असताना देखील प्लांट दाखविण्यासाठी उडवाउडवी करून वेळ काढू धोरण राबवित आहे. त्यामुळे काल तारीख ६ मार्च रोजी प्लांट दाखविण्यासाठी ता. ७ मार्च रोजी उपस्थित राहवे व प्लांट दाखवावे अशी  विनंती केली यावरून आज ता. ७ रोजी दुपारी १२ वाजता वंचितचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात जिल्हा महासचिव मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष किशोर मुन, तालुकाउपाध्यक्ष ओमेश पळवेकर,  महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शारदा मेश्राम, जिल्हा महासचिव वैशाली गायकवाड, तालुका महासचिव प्रणिता ठमके, शहराध्यक्षा अर्चना नगराळे, विशाल कांबळे, सोनू दुर्गे, वसीम शेख, राजेश गजरे, प्यारेलाल मेश्राम, यांचेसह काही कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले परंतु सदर उपविभागीय अभियंता संजय कुतरेकर  हे कार्यालयात उपस्थित नव्हते व त्यांनी आपला मोबाईल बंद करून ठेवला त्यामुळे कार्यालयाचे बाहेरच वंचीतने ठिय्या आंदोलन केले व अभियंत्याच्या या कृतीचा निषेध म्हणून त्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून रोष व्यक्त केला. या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चे होत आहे.