Ticker

6/recent/ticker-posts

मिशन हंड्रेड (100) मध्ये सहभागी व्हा, आणि आपल कर्तव्य पार पाडा

 

          संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांचे आवाहन

News Today

प्रतिनिधी

वणी :- लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना विजयी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी १०० लोकांना मोबाईल व्दारे संपर्क करून मिशन हंड्रेड मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबी यांनी केले आहे.


आपल्या देशातील प्रत्येक निष्ठावान भारतीय लोकांनी निर्भयपणे आपल्या 100 सग्या - सोयऱ्यांना व मित्र मंडळींना फोन करून इंडिया आघाडीच्या उमेदवारास मतदान करण्यास जागृत करावे. व त्यांनाही  मिशन 100 राबवावी जने करून आपल्या कोणत्याही नातलागाचे मतदान इतर कुठंही जाणार नाही.लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे.संविधान बदलविण्यासाठी अबकी बार ४०० पार पाहिजे असे खुले आम वक्तव्य हुकूमशाही प्रवृत्ती करायला लागली.


ही प्रवृत्ती गाडून टाकण्यासाठी, लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी, आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित राहावे यासाठी, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, महिला यांच्या सुरक्षिततेसाठी १००℅ टक्के मतदान करने तरच देश वाचतील असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय पांडुरंग धोबे यांनी केले आहे.