Ticker

6/recent/ticker-posts

भाजपच्या आर्य वैश्य समाजातील उमेदवारीमुळे ओबीसी समाजात नाराजीचा सूर , भाऊ पेक्षा ताईंना जास्त पसंती

 

शेतकरी कन्या प्रतिभाताई धानोरकरांची महिलांमध्ये प्रचाराची धूम
                      
                            ग्राउंड रिपोर्ट 

News Today

दिलीप भोयर
वणी :- येत्या १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील संपन्न होत असलेल्या चंद्रपूर - वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार आर्य वैश्य म्हणजे सावकारी करणाऱ्या समाजातील सुधीर मुनगंटीवार यांना दिल्याने लाखोच्या संख्येने मतदार असलेल्या ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. तर इंडिया आघाडी अर्थातच महविकास आघाडीने दिलेला उमेदवार ही एक महिला असून ती शेतकरी कन्या आहे व ओबीसी समाजातील असल्याने एका महिलेला लोकसभेत पाठविण्याची ऐतिहासिक संधी ओबीसी समाजाला व सर्व महिलांना मिळाल्याने अनेक महिला संघटना व सामाजिक क्षेत्रातील कर्तुत्वाने महिला प्रतिभाताई धानोरकरांच्या प्रचाराला स्वंयपूर्तीने लागलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे भाऊंचे पाय बुडत्या डोहात दिसून येत आहे तर ताईसाठी मात्र सर्व स्तरातून पसंती वाढत आहे.


      सन २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एक मेव काँग्रेस उमेदवार निवडून गेलेले बाळू भाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांची पत्नी प्रतिभाताई धानोरकर या आहेत त्यांना महाविकास आघाडी कडून लोकसभा २०२४ मध्ये उमेदवारी मिळाली असून त्यांनी या निवडणुकीत जिंकण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.
        चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये मतदार समाज निहाय लोकसंख्या  बघितली तर सर्वाधिक मतदार हे ओबीसी समाजाचे आहे. त्यातल्या त्यात शेतकरी व शेतमजूर जास्त प्रमाणात आहे. केंद्रात मोदी सरकार जेव्हा पासून अस्तित्वात आले आहे तेव्हापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव सातत्याने पाडल्या गेल्याने शेकरी प्रचंड नाराज आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक हे कापूस, सोयाबीन, व धान असून मागील दहा वर्षात कोणत्याही शेतमालाला भाव मिळाला नाही उलट शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी मातीमोल किमतीत शेतमाल खरेदी करून तोच माल काही दिवसांनी व्यापाऱ्यांनी अवाच्या सव्वा भावाने विकून हजारो कोटी रुपये नफा कमवीला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भाजप व भाजपाने दिलेल्या व्यापारी वर्गातील सावकारी करणाऱ्या समाजातील उमेदवारीमुळे प्रचंड नाराजीचा सुर उमटलेला दिसून येत आहे. 


     शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव अधिक ५०% नफा देवू अशी घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे आश्वासन हवेत विरल्याने शेतकरी मोठा रोष व्यक्त करीत आहे. तर या भागातील एका शेतकरी कन्येला लोकसभेचे प्रतिनिधीत्व करायला मिळत असल्याने शेतकरी महीलंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांमध्ये प्रचारासाठी जोश निर्माण झाला आहे. हीच एक संधी प्रथमतः मिळाली असून अभी नहीं तो कभी नहीं नारी शक्ती जिंदाबाद म्हणत महिला स्वयंपूर्तीने प्रतिभाताई धानोरकर यांचा प्रचार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अबकी बार सारे हद्दपास नारीशक्ति आरपार होण्याचे चित्र उभे होत आहे.

              वंचित मध्येही ओबीसी उमेदवार 
वंचित बहुजन आघाडीने देखील ओबीसी समाजातील राजेश बेले उमेदवार दिल्याने त्यांची झाड थोडीफार माहविकास आघडीच्या उमेदवारांवर पडणार आहे. त्यामुळे विरोधकांना थोडाफार आशेचा किरण दिसत असला तरी त्यांचा कोणताच परिणाम होणार नसल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहे. असे असले तरी येत्या ११ तारखेला वंचीतचे पक्ष प्रमुख ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची प्रचार सभा वणी येथे आयोजित असून या सभेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.