Ticker

6/recent/ticker-posts

नरेंद्र मोदी हा या देशाचा डाकू आहे- ऍड. बाळासाहेब आंबेडकर

 


ईलेक्ट्रॉरल बाँड म्हणजे जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे.

ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपचा घेतला खरपूस समाचार



News Today

प्रतिनिधी

वणी :- मागील १४ वर्षात देशाच वाटोळं झाल असून देशाला बरबाद करणारा हा असा निर्बुद्ध पंतप्रधान तुम्हाला कधी पासून आवडायला लागला आहे. असा थेट सवाल सनातन हिंदू धर्माच्या लोकांना वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज येथील शासकीय मैदावरिल आयोजित  लोकसभा उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ सभेत विचारला व देशाच्या प्रधानमंत्री ईलेक्ट्रारोल बॉण्डच्या माध्यमातून हजारो कोटीचा डाका टाकला आहे मोदी एक डाकू आहे. असे संबोधिले.

चंद्रपूर -आर्णी - वणी लोकसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकर हे वणीत आले होते. ते पुढे सभेला संबोधित करताना अस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी  इलेक्ट्रॉरॉल बाँड म्हंजे एक प्रकारे हप्ते वसुलीचे काम केले आहे. ज्या प्रमाणे गल्लीतील  दादा जे करतो तेच काम मोदींनी केले आहे. इलेक्ट्रॉरॉल बाँड देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीचे नाव कमी करून सर्वत्र मोदी मोदी करण्यापलीकडे देशात काहीच केले नाही.  छाप्पन इंची छाती सांगणारे आता १४ इंचावर आले आहे. एकीकडे चायना देशात घुसखोरी करून छाताडावर बसला आहे तर दुसरीकडे पाकिस्तान दररोज आपल्या जवानांची हत्या करीत आहे.  यांना सत्तेच्या बाहेर हाकलले पाहिजे. तरच देशातील लोकशाही वाचू शकते अन्यथा कधी हुकूमशाही लागेल कळणार नाही. एखादा उमेदवार उभा असला तर त्याला भाजपा ऐवजी मोदींचा म्हटल्या जाते, सरकार कोणाच तर मोदीच, उमेदवार कोणाचा तर मोदींचा तर मग भाजप कुठ गेलं भाजप आणि आरएसएस पुर्णतः खतम करण्याचे काम स्वतः मोदी करीत आहे. तरी सनातन हिंदू ना कळल आहे. आणि असा निर्बुद्ध पंतप्रधान तुम्हाला चालतो का असा सवाल उपस्थित केला आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन केले. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता परिवर्तन सभे करिता वंचितचे प्रदेश कार्यकारणी सदस्य कुशल मेश्राम, विदर्भ प्रदेश महासचिव बालमुकुंद घिरड, विदर्भ संयोजक रमेश गजभिये,   युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष डॉ . निरज वाघमारे, महासचिव मिलिंद पाटील, शिवदास कांबळे, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर,  मोहन भवरे, रवी भगत, धम्मवती वासनिक, पुष्पा शिरसाट, संघपाल कांबळे, गौतम दारुंडे, प्रतीक मुनेश्वर, राजेश तलवारे, वैशाली गायकवाड, शरदा मेश्राम, अर्चना कांबळे, अर्चना नगराळे, प्रणिता ठमके, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 सदर सभा यशस्वी करण्यासाठी किशोर मुन, राजू चापडे, विशाल कांबळे, सोनू दुर्गे, कपिल मेश्राम, ताई डोंगरे, नंदिनी ठमके, विनोद कोठार, मिलिंद नगराळे, कुंदन नगराळे, अंजू पासवान, अर्चना दुर्गे, सुनीता दुपारे, शंकर रामटेके, केतन रामटेके, विलास तेलतुंबडे, वसीम शेख, रोहित डोंगरे, दीपक राणा, आश्विन दुर्गे राजू गजरे, अक्षय दुपारे, शिवम खोब्रागडे, मोरेश्वर देवतळे, भवरे साहेब यांचे सह युवा व महिला आघाडी तथा भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सभेचे सूत्र संचलन मंगल तेलंग यांनी केले.