Ticker

6/recent/ticker-posts

मोदी सरकार म्हणजे देशाच्या विकासाची नाही, तर देशाला विकायची गॅरंटी - बळीराजा पार्टीचे रामदास पखाले

 

देशाच्या भारत सरकारचे नाव बदलवून मोदी सरकार म्हणने म्हणजे देश मोदीच्या मालकीचा होय का?

News Today

प्रतिनिधी

वणी :- आपल्या देशाच्या सरकारचे नाव हे भारत सरकार आहे. परंतु मागील दहा  वर्षा पासून देशाच्या सरकारचे नाव मोदी सरकार म्हणून संबोधील्या जात आहे. देश काय मोदीच्या मालकीचा आहे काय? मोदी फक्त देशाचे प्रधानमंत्री आहे. मालक नाही. देशाला लोकशाही कडून हुकूमशाही कडे वळविण्याचे हिटलर वृत्तीचे षडयंत्र भाजप व आरएसएस करीत आहे. देशातील मोदी सरकार म्हणजे देशाच्या विकासाची नाही तर देशाला विकायची गॅरंटी आहे. देशाला वाचविण्यासाठी  देशातील नागरिकांनी. मतदारांनी सावध होणे गरजेचे आहे. असा इशारा बळीराजा पार्टीचे विधानसभा अध्यक्ष रामदास पखाले यांनी न्युज टुडेसी बोलताना व्यक्त केले. 

२०१४ आली देशातील भारत सरकार चालविण्यासाठी मोदीच्या नेतृत्वात जनतेने भारतीय जनता पार्टीला संधी दिली. आणि नरेंद्र मोदी या देशाचे  प्रधानमंत्री झाले. परंतु यांनी देश हिताचा एकही निर्णय न घेता देशातील जनतेला महागाई, बेरोजगारी, व गरिबी वाढविली आहे. देशातील शेतकऱ्यांवर शेती विरोधी कायदे लादण्याचे पाप केले आहे. जी.एस.टी. सारखा कर लादून देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक रित्या कंबरडे मोडले आहे. विदेशातून कापूस, सोयाबीन, तुर, कांदा, सारखर टोमॅटो आयात करून देशातील शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव पाडले आहे. ज्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील काढता आला नाही. कोरोणाच्या नावाखाली लॉक डाऊन घोषित करून देशाची आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. सरकारी मालमत्तेचे खाजगी करण करून उधोगपत्यांच चांगभलं केलं आहे. इडी व सीबीआय चा वापर करून इलॉक्ट्रोराल बाँडच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये गैरमार्गाने वसूल केले आहे. पि. एम. केअर फंड माहिती अधिकारापासून दूर ठेवून एका प्रकारे देशाचा घात केला आहे. अशी घणाघाती टीका देखील पखाले यांनी केली आहे.

मागील दहा वर्षात केवळ मोदींनी त्यांच्या मित्रांना सुखी केलं आहे. व शेतकऱ्यांचे शोषण केले आहे. आणि देशातील लोकशाही नष्ट करू पहात आहे. आणि हिटलर मोदिशाही आणू पाहत आहे.  म्हणून देशातील नागरिकांवर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार अस भासवल जात आहे. मोदी म्हणजे विकास नाही तर देश विकायची १००% गॅरंटी देत आहे. आता आपल्या देशाला वाचविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. असे परखड मत रामदास पखाले यांनी व्यक्त केले.



                           रामदास पखाले

         वणी विधनसभा अध्यक्ष, बळीराजा पार्टी

पुन्हा मोदी सरकारमध्ये बसल्यास शेतकऱ्यांच्या शेतीचे अस्तित्व धोक्यात 

नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करून त्यांना उत्पादन खर्च अधिक ५०% नफा असा. शेतमाल भाव देवू असे जाहीर आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासन उलट देशात शेतकरी विरोधी तीन कायदे लादून शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम केले होते. आणि पुन्हा जर हे सत्तेत आले तर शेतकऱ्यांच्या शेतीचे अस्तित्व धोक्यात आहे. त्याच बरोबर लोकशाही देखील धोक्यात आहे.