Ticker

6/recent/ticker-posts

वणी येथील बँक ऑफ महाराष्ट्र महिला शाखा व्यवस्थापकाची नागरिकांसोबत अरेरावी

 


दिवसभर शेतकऱ्यांला थांबवून दिले नाही, कर्ज निलचे प्रमाणपत्र 

News Today 

प्रतिनिधी

वणी  :- येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाणीचे व्यवस्थापक व कर्मचारी यांचे कडून नागरिकांसोबत अरेरावी धोरण राबवून त्यांची पिळवणूक केल्या जात असल्याचा आज ता. २२ रोजी दुपारी  ४ वाजता हा प्रकार समोर आला आहे. 

तालुक्यातील विठ्ठलनगर (विरकुंड)  येथील शेतकरी नामे कवडू कुइटे यांनी त्यांचे शेतावरील पीक कर्जाची परतफेड मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी केली आहे. त्या कर्जा संदर्भात कर्ज निलचा दाखला मिळावा यासाठी आज तारीख २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता रीतसर अर्ज केला होता व त्यांना ४ वाजता प्रमाणपत्र देण्याचे बँकेकडून सांगण्यात आले. सदर शेतकरी यांनी ४ वाजेपर्यंत वाट बघून त्यांना सदर प्रमाणपत्र न मिळत असल्याने त्यांनी बँकेकडे प्रमाणपत्राची मागणी केली. परंतु त्यांना दुसऱ्या दिवशी देण्याचे सांगण्यात आले. दिवसभर शेतकऱ्यांना थांबवून त्यांना माघारी पाठविण्यात आले आहे. जेव्हा की कर्जाची परतफेड केली असताना त्यांना कर्ज निल प्रमाणपत्र देणे बँकेची जबाबदारी होती. याबाबत त्यांनी त्यांचे नातेवाईकांना बँकेत बोलवले असते बँकेचे कर्मचारी व व्यवस्थापक यांनी सुरळीत उत्तर न देता किंव्हा तक्रारीची कोणतेही निवारण न करता हुज्जत घातली व आरेरारी केली आहे. असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. व या विषयी वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे व संबंधित व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.महिला व्यवस्थापक असल्याने ग्राहक मुकाट्याने सहन करतात अपमान 

येथील बँकेच्या व्यवस्थापक पदावर एक महिला असून ही महिला बँकेत येणाऱ्या ग्राहकांना व नागरिकांना उर्मटपणाची वागणूक देत असल्याची चर्चा आहे. बँक ही नागरिकांना आर्थिक सेवा पुरविणारी एक जबाबदार यंत्रणा असून व्यवस्थापक व कर्मचारी हे नागरिकांची सेवा करण्यासाठी कटिबध्द आहे. परंतु व्यवस्थापक व कर्मचारी बँकचे स्वताला मालक समजून ग्राहकांवर व नागरिकां सोबत उद्धट पणाची वागणूक देत असल्याने बँकेप्रती रोष वाढत आहे. तरी संबधित व्यवस्थापक महिलेची व कर्मचाऱ्यांची उचित चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर पकडत आहे. महिला व्यवस्थापक असल्याने अनेक जण अपमान सहन करून गप्प बसत आहे.