Ticker

6/recent/ticker-posts

उद्धटपणाचा कळस गाठणाऱ्या महिला व्यवस्थापकावर वरिष्ठ कार्यवाही करतील का ?

 

बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांचे करवाईकडे लागले लक्ष

News Today

प्रतिनिधी

वणी :- येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या महिला व्यवस्थापक ह्या अत्यंत उर्मट व उद्धटपणाची वागणूक ग्राहकांना व नागरिकांना देत असल्याने अनेक ग्राहक व नागरिक बँकेच्या अश्या वागणुकीबाबत प्रचंड नाराज आहेत. काल ता. २२ एप्रिल रोजी त्यांचे विरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून यावर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे सर्व ग्राहकांचे लक्ष लागले आहे. 

तालुक्यातील विठ्ठलनगर (विरकुंड) येथील शेतकरी कवडू कुईटे यांनी डिसेंबर महिन्यात त्यांचे शेतीवर असलेल्या कर्जाची परतफेड केली आहे. त्यासाठी त्यांनी काल तारीख २२ रोजी रीतसर बँकेला अर्ज करून कर्जचा निल दाखला देण्याची मागणी केली. सदर कर्मचारी यांनी ४ वाजता दाखला मिळेल असे सांगून त्यांना वाट बघायला सांगितले ४ वाजता सदर शेतकऱ्यांनी दाखला देण्याची मागणी केली असता. बहाणे बताने लावून उद्या दाखला देण्यात येईल असे सांगितले. दिवसभर वाट बघून दाखला मिळत नसल्याचे पाहून त्यांनी त्यांचे नातेवाईकांना बोलवले असता त्यांनी दाखला का मिळत नाही असे विचारले असता संबंधित कर्मचारी हा अरेराविने बोलू लागला व त्यानंतर सर्वांनी व्यवस्थापक यांचेकडे मागणी केली असता त्या देखील उद्धट व उर्मटपनाची भाषा वापरत अरेरावी करायला लागले. व्यवस्थापक ह्या एक महिला आल्याने कोनीही त्यांच्या सोबत वाद घालत नव्हते. परंतु महिला असल्याचा फायदा मात्र संबंधित महिला व्यवस्थापक उचलून इतरांवर रुबाब टाकत होत्या.अनेक ग्राहकांना मिळतो आहे उर्मटपणाचा अनुभव

वणी येथील बँक ऑफ महाराष्ट्र ही एक नामवंत शाखा आहे. या शाखेत अनेक प्रतिष्ठित नागरिक व हजारो शेतकऱ्यांचे खाते आहे. ग्राहकांना उचित सेवा पुरवणे व नागरिकांच्या तक्रारीवर संयमाने निवारण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु या महिला आपले सर्व कर्तव्य विसरून अरेरावी करणे, नागरिकांवर चवताळून जाणे, उर्मट भाषेत बोलणे, ग्राहकांना अपमानित करणे, असभ्य वागणूक देणे आदी प्रकार करीत आहे. याबाबत चंद्रपूर झोन अधिकारी व आरबीआयकडे  ईमेलवर तक्रार नोंदविण्यात आली आहे. तरी यांचेवर काय कारवाई केल्या जाते याकडे सर्व ग्राहकांचे लक्ष लागले आहे.