Ticker

6/recent/ticker-posts

बँक ऑफ महाराष्ट्राच्या वादग्रस्त महिला व्यवस्थापिकेची अखेर चौकशी सुरु

 

महिला व्यवस्थापिकेच्या उर्मट वागण्यामुळे अनेक ग्राहक खाते बंद करीत असल्याची माहिती

News Today

प्रतिनिधी

वणी :- येथील उर्मट व अर्वाच्च भाषेचा वापर करून ग्राहक व नागरिकांसोबत हुज्जत खालून घालणाऱ्या येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वादग्रस्त महिला व्यवस्थापीकेची अखेर चौकशी नेमण्यात आली असून यासाठी चंद्रपूर झोनल कार्यालयाचे पथक चौकशी रीतसर चौकशी करीत असल्याची माहिती आहे. या महिला व्यवस्थापिकेच्या उर्मट वागण्यामुळे अनेक ग्राहक आपले खाते बंद करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दोन दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या महिला व्यवस्थापिका व एका कर्मचाऱ्यांनी शेतकरी व नागरिकांसोबत गैरवर्तन करत  अरेरावी व हुज्जत घातली होती याबाबत संबंधित बँकेच्या चंद्रपूर येथील झोनल अधिकारी यांचेकडे व आर.बी.आय. नागपूरकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. या तक्रारीची  दखल घेण्यात आली आहे. तक्रारीवरून चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे. 

ग्राहकांच्या भरोष्यावर बँकेचा आर्थिक व्यवहार अवलंबून असला तरी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवरून ग्राहकांमध्ये आपुलकीचे संबंध जोपासल्या जात असतात. एक एक ग्राहक आपल्या बँकेत यावे अशी वेळ बँकांवर आली आहे. वणी सारख्या शहरात दर महिन्याला एक नवीन बँक अथवा पत संस्था आणि मल्टी को ऑपरेटिव्ह संस्था उघडल्या जात आहे. अश्या स्पर्धेच्या युगात बँकेने आपापले प्रत्येक ग्राहक जोपासणे गरजेचे झाले आहे. परंतु येथील या महिला व्यावस्थापिकेच्या उर्मट वागण्यामुळे अनेक ग्राहक त्रास सहन करीत आहे. व अनेकांनी आपले खाते बंद करून इतर बँकेत खाते उघडत असल्याची माहिती आहे. या विषयी वरिष्ठांनी दखल घेवून त्वरित चौकशी नेमुन उपाय योजना आखाव्या अन्यथा बँकेचे भविष्य अंधारात असल्याचे बोलल्या जात आहे.