Ticker

6/recent/ticker-posts

शेतातील बंड्याचे कुलूप तोडून सहा पोते मिरची लंपास

 

          रासा येथील भरत कुमरे यांचे शेतातील घटना

News Today

प्रतिनिधी

वणी :- तालुक्यातील रासा शिवारात रस्ता लागत असलेल्या भारत कुमरे यांच्या शेतातील शेत बंड्याचे कुलूप तोडून सहा पोते लाल सुकेलेली मिरची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २५ एप्रिल रोजीच्या रात्री घडली आहे.वणी येथील शेतकरी भारत कुमरे यांचे शेत घोंसा मार्गावरील रासा शिवारात रस्त्या लगत आहे. त्यांचे शेतात शेत साहित्य ठेवण्यासाठी बंडा बांधलेला आहे. या बंड्यात त्यांनी शेतात लावलेली मिर्ची तोडून ठेवली होती. मिरची चे बाजार दर घसरल्याने ते जमा करून ठेवली होती.  परंतु या मिरचीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने भरत कुमरे यांच्या मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी परिश्रम घेवून पिकवलेले शेतपिक चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मनोबल ढासळले आहे. याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई नसल्याचे कुमरे यांनी सांगितले आहे.


शेतातील चोरी प्रकरणात दिवसेंदिवस वाढ
शेतातील शेत साहित्य व कापूस,सोयाबीन, तूर, मिरची व इतर पिके शेरातच ठेवल्या जात असल्याने अवाडावा बघून चोरटे आपला हात साफ करीत आहे. तरी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.