Ticker

6/recent/ticker-posts

*अंबिका नगर ( यवतमाळ ) परिसरातील भीम विचारांच्या अनुयायांनी साजरी केली भीम जयंती*

 

News Today

प्रतिनिधी

यवतमाळ :-  यवतमाळ येथील अंबिका नगराच्या परिसरात भीम जयंती भीम, भीम गीते, वेशभूषा स्पर्धा,  प्रबोधन व कीर्तनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर विचार पेरण्यासाठी ही जयंती साजरी करण्यात आली. 

   महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त  केले आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कल्याणी मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून करुणा चौधरी, अभिलाष उरकुडे प्रतीक वानखेडे गौरव बन्सोड, दिक्षा  वनकर ,अमन शिंगाडे, पंकज मून , संस्कार ठमके,आदी उपस्थित होते.  समस्त धम्म बांधवांनी एकत्रित येऊन 22 ते 28 तारखेच्या कालावधीत विशाखा बुद्ध विहार अंबिका नगर येथे हा समारोह पार पाडला.