Ticker

6/recent/ticker-posts

*साडे चार हजाराची घेतली लाच, तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात , मारेगावातील घटना*

 

News Today 

प्रतिनिधी

वणी :- येथून जवळच असलेल्या मारेगाव तालुक्यातील खैरगांव साजा व चिंचमंडळ गावाचा अतिरिक्त प्रभार असलेले तलाठी शालीक मारोती कनाके यांना 4 हजार 500 रू. ची लाच स्वीकारतांना आज मंगळवारला दुपारी 2 वाजता मारेगाव येथील सुभाष नगर स्थित भाड्याने असलेल्या खोलीत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.या कारवाईने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.कनाके यांचेकडे मारेगाव तालुक्यातील अतिरिक्त प्रभार असलेल्या चिंचमंडळ येथील एका शेतकऱ्याचा शेतीचा फेरफार करण्यासाठी तब्बल पाच हजार रू. मागणी करण्यात आली. तडजोडी अंती साडेचार हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.

मात्र, केवळ फेरफार करिता या जम्बो रकमेची सल पिडीत शेतकऱ्यात असतांना थेट यवतमाळ एसीबी कार्यालय गाठले. त्यानुसार आज दुपारी सापळा रचून तलाठी शालीक कनाके यांना मारेगाव येथे   लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले. या  बाबतची मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


 ही कारवाई पोलीस अधिक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल पवार (अमरावती ), पोलीस उप अधिक्षक उत्तम नामवाडे, पो.नि.विनायक कारेगावकर यांच्या मार्गदर्शनात सापळा पथक पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, संजय कांबळे, वसीम शेख, अतुल मते, सचिन भोयर,भागवत पाटील, सुरज मेश्राम, राकेश सावसाकडे, सतीश सोनोने (यवतमाळ )यांच्या पथकाने केली.