Ticker

6/recent/ticker-posts

ढोंगी व संधीसाधू ओबीसी भाजपच्या दावणीला - ओबीसी कार्यकर्ते सुभाष वैद्य यांचा आरोप

 

              सुभाष वैद्य.             प्रतिभाताई धानोरकर

चंद्रपुरात सावकार भाऊ पेक्षा प्रभावी ठरणार शेतकऱ्यांची प्रतिभा 

News Today 

दिलीप भोयर

वणी :-  महायुतीने महा बलाढ्य संख्येने असलेल्या ओबीसी समाजाचा उमेदवार न दिल्याने ओबीसीमध्ये कमालीची नाराजगी पसरली आहे. केवळ स्वार्थासाठी भाजपच्या दावणीला बांधलेले काही मूठभर ओबीसी स्वयंघोषित नेते केवळ भाजपाचा उदो उदो करीत आहे. असा आरोप करीत चंद्रपूरच्या सावकार भाऊ पेक्षा लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांची प्रभावशाली  प्रतिभा मात्र चमकून दिसन आहे. असा विश्वास ओबीसी कार्यकर्ते तथा शेतकरी हितचिंतक सुभाष वैद्य यांनी दाखवला आहे. 

कोरोणा काळात माहाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीन ७ ते ८ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला होता परंतु महाविकस आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून महायुतीच्या निर्माण झालेल्या अनौरस सरकार मध्ये कापसाला ६ हजार तर सोयाबीन ३५०० ने विकाव लागल्याने शेतकरी वर्गात सरकार प्रति मोठी सल निर्माण झाली आहे.

मागील सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पाडण्यासाठी केंद्रातील सरकारने ऑस्ट्रेलिया या देशातून सुमारे ४ लाख टन कापसाच्या गठानी आयात केल्या होत्या त्यामुळे कापसाचे भाव भुईसपाट झाले होते. कापसाबाबत कधी न घडणाऱ्या इतिहासात शेतकऱ्यांनी वर्षभर कापसाची घरात कोंडी करून ठेवली होता. तरी देखील शेतकऱ्यांच्या हातात केवळ धूतुरा लागला होता.

सन २०१४ मध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला १० हजार प्रती क्विंटल भाव मिळत होता तर खताची बॅग ५०० रुपयाला मिळत होती. आज कापसाला भाव ६ हजार तर खत २ हजारापर्यंत गेलं आहे. शेतकऱ्यांना शेती करन देखील अवघड करून ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत मोठी वाढ झाली आहे. असे असताना व सर्व सत्य डोळ्या समोर दिसत असताना देखील काही ओबीसी वर्गातील भुरके , संधीसाधू ढोंगी बगळे पुढारी भाजपाचा उदो उदो करत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी नितीमत्ता गहाण ठेवून देशाला गुलामी कडे वळविनाऱ्या व्यवस्थेला प्राधान्य देणे म्हणजे हा देखील देशद्रोह आहे. असे परखड मग सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी हितचिंतक ओबीसी कार्यकर्ते सुभाष वैद्य यांनी न्यूज टुडेशी बोलताना व्यक्त केले.

             अंधभक्ती ही एड्स पेक्षाही खतरणाक बिमारी

काही तरुणांमध्ये प्रचंड अन्धभक्ती दिसून येत आहे. ही बीमारी एड्स पेक्षाही खतरनाक झाली आहे. तरुणांनी रोजगार शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्यातील अंधाभक्ती त्यांचंच भविष्य नष्ट करीत आहे.

                                                                  सुभाष वैद्य, वणी