Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी आपल्या सभेत एकही मुद्दा शेतकऱ्यांच्या हिताचा मांडला नसल्याने शेतकरी नाराज

 

पराभवाच्या नैराश्यातून ना. सुधीर मुनगंटीवार यांचा मानसिकतेचा तोल घसरला

नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून गर्दीसाठी नागरिकांची आयात

News Today

प्रतिनिधी

चंद्रपूर :- येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्शभुमिवर  मोरवा येथील धावपट्टीजवळ आज ता. ८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता संपन्न झालेल्या भाजपच्या प्रचार सभेत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात कोणताही ठोस मुद्दा न मांडल्याने शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी पसरली आहे.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली लोकसभा निवडणुकीतील रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज चंद्रपूर नजिक असलेल्या मोरवा  धावपट्टी जवळ भाजपच्या वतीने भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाभेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, यांच्यासह गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते, तर चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते. 


  यावेळी अनेक नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली परंतु यातील एकही नेत्याने शेतकऱ्यांच्या ठोस विकसित धोरणावर भाष्य न केल्याने शेतकरी या मतदार यंत्रणेतील दुवा नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाहीतील सांसद ही देशाच्या विकासाचे धोरण ठरविणारा महत्वाचा घटक आहे. यात शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण ठरत  नसेल तर हे सरकार शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाही अशी खंत काही उपस्थित शेतकरी बोलून दाखवत होते.


ना. सुधीर मुनगंटीवार यांचा मानसिकतेचा तोल घसरला 

राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री तथा चंद्रपूर,आर्णी ,वणी लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात असांस्कृतिक भाषेत केवळ व्देष पसरतील अश्या भाषेचा वापर करीत बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे भाष्य केल्याने उपस्थित महिलांना देखील लाजेने मान खाली टाकून बघावे लागले होते. अश्या गैरसंविधनिक शब्दाचा वापर एखाद्या मंत्र्यांच्या तोंडून निघाल्याने सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे. पराभवाच्या नैराश्यातून मुनगंटीवार यांचा तोल घसरत जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 

स्थानिक मतदरसंघांपैक्षा इतर जिल्ह्यातील मतदारांची गर्दीसाठी केली आयात

गडचिरोली व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स्थानिक मतदार क्षेत्रातील मतदारांऐवजी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, व लगतच्या मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नागरिकांना गर्दी करण्यासाठी आयात करावे लागले अशी चर्चा चंद्रपुरात ऐकायला मिळत आहे.

ना. हंसराज अहिर यांना मनोगत मांडण्यास न दिल्याने संधी भैय्या गटात नाराजी

भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार तथा केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष ना.हंसराज अहिर (भैया) यांना मोदीच्या सभेत बोलायला संधी न दिल्याने भैया गटातील कार्यकर्त्यांमध्ये रुसवे फुगवे निर्माण झाले आहे. चंद्रपूर मतदार क्षेत्रात ओबीसी मतदार संख्या ७० ते ७५% असताना देखील भाजपाने भैया हे ओबीसी असून त्यांची उमेदवारी नाकारली आणिआर्य वैश्य (सावकारी) समाजाला उमेदवारी दिली त्यातच मोदीच्या सभेत बोलायला देखील संधी न दिल्याने भैया गटात "भाऊ"गिरवायला सुरवात झाली आहे.

बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे भाष्य वापरत असलेल्या ना4. मुनगंटीवारांच्या  बघा व्हिडिओ