Ticker

6/recent/ticker-posts

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा

 

संस्थेचे अध्यक्ष राजेश पहापळे यांनी जारी केलं पत्र

News today

प्रतिनिधी

वणी :- धनोजे कुणबी समाज संस्था, वणी रजिस्टर क्रमांक ८६५६ (य) ३०२/२०२४ यांनी इंडिया आघाडीचे लोकसभेतील उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. असे पत्र संस्थेचे अध्यक्ष राजेश पहापळे यांनी प्रसिद्धीस ता. १६ एप्रिल रोजी जारी केले आहे.


धनोजे कुणबी संस्था ही सदैव बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असून  प्रगती व सर्वांगीण विकासासाठी परिश्रम घेत आहे. समाजातील एका महिलेला लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी  महाविकास आघाडी कडून संधी मिळाली आहे. त्यामुळे समाजाला एक इतिहास घडविण्याची वेळ आहे. त्या करिता येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व समाज बांधवांनी प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेत निवडून पाठवावे करिता कुणबी समाज संस्थेकडून जाहीर पाठिंबा देवून आवाहन करण्यात आले आहे.