Ticker

6/recent/ticker-posts

*वार्षिक १०० क्विंटल कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे मोदी सरकार कडून १० वर्षात ३० लाखाचे नुकसान.....*

 

देशात प्रचंड प्रमाणात कापूस असतांना ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतून कापसाची आयात का ?

News Today

दिलीप भोयर
वणी :- देशातील प्रमुख पिकांपैकी कापूस हे अत्यंत महत्वाचे पीक आहे. या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मागील १० वर्षात  नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येवून आर्थिक रित्या चांगलेच नागवून सोडले आहे. ऑस्ट्रेलिया   व अमेरिका येथील कापूस व कापसाच्या गाठी आयात करून वार्षिक १०० क्विंटल कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे जवळपास ३० लाख रुपये नुकसान केले आहे. असा आरोप शेतकरी करीत आहे.

सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे सत्तेत येण्या अगोदर कापसाचे दर जवळपास. १० हजार येवढे होते. आणि त्या नंतर सातत्याने कापसाचे दर खाली घसरत आले. कापसाची निर्यात केली असती तर कापसाला १२ ते १५ हजारापर्यंत भाव गेला असता परंतु दरवर्षी कापसाची आयात करून कापसाला ७ हजाराचेवर जावू दिले नाही. उलट खतांचे दर, बियाणाचे दर, पेस्टीसाईडचे दर, तीनपट वाढवले आहे. त्यातल्या त्यात शेती साहित्यावर १८% जीएसटी कर आकारणी करून शेतीला प्रचंड मोठ्या संकटात आणल आहे. 

     कापसाच्या उत्पादनावर सुनियोजन सुरळीत झाल असत तर सन २०१४ पासून १० हजार रुपये प्रति क्विटल  दर मिळाला असता पण ७ हजार रुपयाच्या वर भाव जाऊ दिला नाही.  म्हणजे ७हजार रुयाच्या  ठिकाणी  १० हजार रुपये भाव दिला असता तर क्विंटल  मागे ३ तीन हजार रुपये वाढले असते १००  क्विंटल गुनीला ३ हजार अस गुणाकार केला तर  एका १०० क्विंटल कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे एका वर्षाला ३ लाख रुपये नुकसान झालं  तर  १० वर्षाची बेरीज केली तर  ३० लाख रुपये येवढे आर्थिक नुकसान केले आहे. प्रत्येक शेतकरी १०० क्विंटल जरी पिकवित नसले तरी ज्या प्रमाणात शेतकरी कापूस पिकवित आहे. त्या प्रमाणे त्यांचे लाखो रुपये नुकसान करून त्यांना चंगलेच नागवले आहे. सत्तेत येण्यापूर्वी प्रत्येकाच्या खात्यात नरेंद्र मोदी यांनी १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ते तर दिलेच नाही उलट शेतकऱ्यांच्या हक्काचे व त्यांच्या परिश्रमाचे ३० लाख रुपये व्यापाऱ्यामार्फत बळकावले आहे. असा आहे गुजरात मोदींचा  पॅटर्न  जो शेतकऱ्याला लुटा आणि व्यापाऱ्याला जगवा असा आहे. देश का कृषी प्रधान आहे तर कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या धोरणावर आज नरेंद्र मोदी का बोलत नाही. असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.

केंद्रातील भाजप प्रणित मोदीने कोणत्या देशातून काय आणल 

कापूस आस्ट्रेलीया व अमेरिकेतून, तर मोझाबिया, कांदा अफगाणिस्थान, साखर, पाकिस्तान, टोमॅटो नेपाल पाम तेल विविध देशातून आयात करून शेतातील शेतमाचे भाव भारतीय जनता पार्टीने मोदीच्या नेतृत्वात सत्तेत येवून पाडले आहे. शेतकऱ्यांना घाम गाळून पिकविलेल्या मालाचे भाव कवडी मातीमोल करून व्यवसाहिकांना नफा मिळून दिला व इलेक्ट्रोरल बाँडच्या माध्यमातून दलाली करून आपली तिजोरी भरली आहे. आता हीच वेळ आहे या सर्व बाबीचा प्रतिरोध घेण्याची त्यासाठी समजून उमजून मतदान करायचे आहे असे आवाहन विनोद निमकर या शेतकऱ्यांनी केले आहे.