Ticker

6/recent/ticker-posts

निवडणूक आयोगाकडून राजमुद्रे ऐवजी M नावाच्या मुद्रेचा वापर

 


M फॉर महाराष्ट्र की मोदी,  EC ने स्पष्टीकरण देण्याची मागणी

News Today

प्रतिनिधी

वणी :- निवडणूक आयोगाकडून प्रत्येक निवडणुकीत भारतीय रजमुद्रेचा वापर करण्यात येत होता परंतु या निवडणुकीत एम नावाची मुद्रा वापरण्यात येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा एम महाराष्ट्राचा की मोदीचा असा संभ्रम निर्माण झाला असून यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देण्याची मागणी जोर पकडत आहे. 

नुकत्याच देशातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या निवडणुका म्हणजे  लोकसभेच्या असतात या निवडणुकांसाठी १६ मार्च रोजी आचार  सहिता घोषित होऊन दिनांक १९ एप्रिल व २६ एप्रिलच्या दोन टप्प्यातील निवडणुका संपन्न झाल्या आहे. यानिवडणुक प्रणालीतील बूथ वरील मतपेट्या बंद करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून भारतीय राजमुद्रेचा वापर करण्यात येत होता. परंतु या निवडणुकीत राजमुद्रे ऐवजी चक्क एम लीहलेला शिक्का वापरल्या जात असल्याची धक्का दायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे ही मुद्रा नेमकी कशाची आहे. असा प्रश्न निर्माण झाला  आहे. 

लोकशाहीची वाटचाल हुकूमशाही कडे तर नाही ना ?

देशाची सत्ता ही सार्वभोम लोकशाही आहे. यात सर्व जाती, पंथ, धर्माला समान संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणून देशाचा ध्वज हा तिरंगा व त्यावर निळ्या रंगाचं अशोक चक्र दिले आहे. त्याच बरोबर तीनमुखी सिहाची मुद्रा ही राजमुद्रा म्हणून घोषित आहे. त्या मुद्रेच्या खाली सत्यमेव जयते असे लीहले आहे. म्हणजे सत्याचा विजय असो सर्वांना समानता असो परंतु ही राजमुद्रा निवडणूक आयोगाकडून न वापरता एम नावाची मुद्रा वापरण्यात येत आहे. नेमका का एम फॉर म्हणजे काय ? अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे खरच ही लोकशाही धोक्यात आली आहे का? यावर सर्वांनी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.