Ticker

6/recent/ticker-posts

गुरुकुल मध्ये सुसंस्कार शिबिराला सुरवात

 

तिवसा येथील माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन

News Today

प्रतिनिधी

गुरूकुंज मोझरी :- दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वयोगट दहा ते अठरा पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले या संस्कार शिबिरामध्ये महाराष्ट्र तेलंगणा मध्य प्रदेश या राज्यांमधून जवळपास २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या शिबिराचे काल ता. २ मे २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता सामुदायिक प्रार्थना नंतर शिबिराच्या उद्घाटन सोहळा पार पडला त्यामध्ये तीवसा नगरपरिषदेचे  माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार आज काळाची गरज आहे व्यसन निर्मूलन,सर्वधर्मसमभाव,आदर्श दिनचर्या, योग प्राणायाम, मैदानी खेळ या सर्व विषयांवर राष्ट्रसंतांनी लिखाण केलेले असून आजच्या पिढीपर्यंत तो विचार पोहोचवणे हे कार्य या शिबिराच्या माध्यमातून केल्या जात असल्याची भावना उद्घाटन प्रसंगी बोलताना वैभव वानखडे यांनी व्यक्त केली. 

१ मे ते १५ मे दरम्यान चालणाऱ्या या सुसंस्कार शिबिरामध्ये ध्यान-प्रार्थना, योग-प्राणायाम, भजन-संगीत,संत साहित्य,मार्शल आर्ट कराटे, लाठी-काठी रोक-मल्लखांब मल्लखांब व इतर मैदानी खेळ शिकविल्या जाणार असून राष्ट्रप्रेम, स्वावलंबन, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्व विकास असे विषय देखील तज्ञांकडून शिकवण्यात येणार असल्याची माहिती श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल चे संचालक  रवी मानव यांनी दिली.


या उद्घाटन समारोहामध्ये तिवसा येथील नगरसेवक  अमर वानखडे, रोशन ठाकरे, पवन खरासे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ह.भ.प. नामदेव महाराज गव्हाळे होते. समाजातून एकीकडे नैतिक मूल्ये दुर्मिळ होत चाललेली आहे तर दुसरीकडे संस्कार शिबिराच्या माध्यमातून ही नैतिक मूल्य समाजात पेरण्याचे कार्य होत असल्याचे गौरवोद्गार अध्यक्षीय भाषणात बोलताना नामदेव महाराज गव्हाळे यांनी काढले. 


सदर शिबिर हे पूर्णतः लोकसहकार्याने चालत आहे. स्वयंप्रेरणेने गुरुदेव सेवा मंडळातील कार्यकर्ते एक वेळचे भोजनदान करीत आहे तर गावागावातून धन्य स्वरूपात सहकार्य पाठविल्या जात आहे. शिक्षक सेवा भावनेने काम करीत आहे, त्यामध्ये कराटे शिक्षक मेजर बंडू खडसे व आर्यन खडसे, संगीत शिक्षक डॉ श्रीकांत काळे व प्रज्वल टोंगे, बौद्धिक शिक्षक छाया मानव व प्रज्वल चोखट,लाठीकाठी हर्ष बारापात्रे व स्वप्नील बारापात्रे, लेखा विभाग तुलशीदास झुंजुरकार व सुधीर निस्ताने,प्रदीपपाल चौधरी पार पाडणार असल्याची माहिती श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल चे संचालक रवी मानव यांनी दिली.