Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर येथील प्रकाश कुचनकर व चंद्रशेखर कुचनकार यांचेवर बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद

 

व्हॉट्सॲप गृपवर अनाठायी व्यक्तव्य करण्याचा छंद आला अंगलट

News Today

प्रतिनिधी

चंद्रपूर :- चंद्रपूर येथील रहिवासी असलेले प्रकाश कुचनकर व त्याचा भाऊ चंद्रशेखर कुचनकर यांचेवर जीव मारण्याचा आरोपाखाली बल्लारपूर  पोलिस स्टेशन येथे विवेक खुटेमाटे यांचे तक्रारीवरून आज तारीख २ जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

धनोजे कुणबी मित्र परिवार म्हणून व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपचे ऍडमिन म्हणून  प्रकाश कुचनकर व इतरही एक ते दोन जण आहेत. चंद्रशेखर कुचनकर हे देखील या ग्रुप मध्ये आहेत. या गृपमध्ये काही दिवसापूर्वी विवेक खुटेमाटे यांना समाविष्ट करण्यात आले होते. परंतु या गृपावरील या अडमिन कुचनकर बंधूची अरेरावी व दादागिरी पाहून खुटेमाटे यांनी हा ग्रुप सोडला असताना देखील त्यांचेवर अपशब्द वापरून त्यांना अपमानित करण्यात येत होते त्यामुळे खुटेमाटे यांनी प्रकाश यांना फोन करून हा प्रकार थांबविण्याची विनंती केली असता त्यांनी खुटेमाटे यांनाच अपशब्द बोलून फोन कट केला असता थोड्यावेळाने प्रकाशचा भाऊ चंद्रशेखर कुचनकर यांनी विवेक खुटेमाटे यांना कॉल करून जीव मारण्याची धमकी दिली असता विवेक खुटेमाटे यांनी बल्लारपूर पोलिस स्टेशन गाठून या कुचनकर बंधूंच्या विरोधात तक्रार दाखल केली असता त्यांचेवर कलम ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

समाजाच्या नावाखाली ही अरिरारी खपविल्या जाणार नाही - विवेक खुटेमाटे

धणोजे कुणबी कोणत्याही राजकीय अथवा गैररजकिय संघटनेचा गुलाम आलेला समाज नसून शेतीप्रिय व शांतीप्रिय समाज आहे. समाजाच्या नावाखाली ग्रुप तयार करून स्वतःच हे लोक इतरांना ग्रुपमध्ये समाविष्ट करीत असतात. फेक मेसेजेसवर सातत्याने वाद घालत असतात  त्यामुळे यांना अद्दल घडविणे गरजेचे आहे. पोलिसांनी जर योग्य न्याय दिला नाही तर न्यायालयीन दाद मागण्यात येईल अशी माहिती विवेक खुटेमाटे यांनी दिली आहे. त्यामुळे प्रकाश कुचनकर व चंद्रशेखर कुचनकर या दोघांच्या अडचीनित वाढ होण्याची शक्यता आहे.