Ticker

6/recent/ticker-posts

एका विकास पुरुषाला एका बाईंनी पाडलं एका बाई नी पाडलं

 

                  भाऊचा विकास झाला भकास होता

 चंद्रपूर लोकसभेतील सहाही विधानसभेतील देखील होणार आता बदल

दिलीप भोयर

वणी :- राज्याचे सांस्कृतिक व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एका सामान्य घरच्या शेतकऱ्याच्या लेकीने लोकसभेच्या निवडणुकीत धूळ चारल्याने संपर्ण मतदार संघात एका विकास पुरुषाला एका बाईने पाडलं, एका बाईंनी, अशी जोरदार चर्चा असून भाऊचा विकास होता की भकास होता असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुढे चंद्रपूर लोकसभेतील वणी, केळापूर, वरोरा, चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील येत्या निवडणुकीत बदल घडणार आहे. 


चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघातील लोकसभा निवडणुकीवर संपर्ण राज्याचे लक्ष लागले होते कारण सन २०१९ मध्ये मोदींची लाट असताना संपर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची लाज बाळूभाऊ धानोरकर यांनी राखली होती. दुर्दैवाने त्यांचा मागील वर्षी अल्पश्या आजाराने निधन झाले होते. त्यांच्या प्रच्यात त्यांची पत्नी एका शेतकऱ्यांची लेक असून ती देखील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार झाल्या व आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून भाजपच्या दिग्गज नेत्याला धूळ चारली आहे. त्यांनी या निवडणुकीत जवळपास सव्वा दोन लाखाच्यावर मतांनी विजय विळविला आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदार संघात विकास पुरुषाला एका बाईंनी पाडलं एका बाईंनी पाडलं अशी जोरदार चर्चा रंगून येत आहे. 


                  शेवटी अहंकाराचा पराभव होतोच

भारतीय जनता पार्टीने मागील दहा वर्षात केंद्रात सत्ता भोगत असून व जनतेच्या विकास ऐवजी हिंदू मुस्लिम वाद व बेताल व्यक्त्यव करून जनतेचे लक्ष विचलित केले होते. आणि सत्तेचा प्रचंड अहंकार त्यांचेकडून दिसून येत होता तसेच इतर पक्षाची फोडा फोडी करून आपसात झगडे लावण्याचे काम केल्याने राज्यात देखील त्यांची चांगली माघार दिसून येत आहे.  तसेच केंद्रातील सीबीआय,  ईडी, इन्कम टॅक्स विभागाचा गैर वापर करून अनेकांना ब्लॅक मेल केले तसेच इलेक्ट्रोलर बांड सारखे प्रकार घडवून हजारो कोटींचे घोटाळे केले आहे. या सर्व बाबींचा मतदारांवर परिणाम दिसून आला आहे. लोकसभेतही मतदारांनी पाठ फिरवली आहे आता विधानसभेतही भाजपला पराभव स्वीकारावा लागणार आहे असे चित्र आजच उभ झाल आहे. मतदारांनी पुन्हा एकदा धानोरकर परिवारात आणखी एक महिला खासदार दिल्लीत पाठवून दिवंगत बालुभाऊ धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.