Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याची प्रतिभा लोकसभेत चमकणार सौ. धानोरकरांना १ लाखाच्यावर आघाडी,


                  न्युज वणी टुडे चे भाकीत खरं ठरणार

News today 

दिलीप भोयर

वणी :- नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीची मत मोजणी आज सकाळी ८ वाजता पासून सुरू झाली असता सुरवातीपासूनच शेतकऱ्यांची लेक तथा दिवंगत माजी खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची अर्धांगिनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १लाखाचे वर मतांनी मागे टाकले  आहे. या अगोदरच न्युज वणी टुडे कडून शेतकऱ्यांची प्रतिभा लोकसभेत चमकणार या मथळ्याखाली ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता अखेर ते भाकीत आता खरे ठरत आहे.



चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकंदरीत १९ लाखाचे वर मतदार असून यातील जवळपास १० लाखाचे वर मतदार हे शेतकरी ओबीसी समाजाचे असून या मतदार संघात ओबीसी समाजाची खूप मोठी पकड आहे. त्यामुळे भाजप कडून ओबसी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अपेक्षित असताना  संपूर्ण मतदार संघात २ हजार ५०० च्या जवळपास  असलेल्या आर्य वैश्य कोमटी समाजाचे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देवून तमाम ओबीसी समाजाचा एका प्रकारे अपमान केला होता. त्यातच भाजपचे माजी गृहमंत्री तथा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना देखील डावल्याने तमाम भाजपतील ओबीसी कार्यकर्ते देखील नाराज होते. 


तसेच सत्तेतील भापने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव सातत्याने पाडल्याने शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात नाराज होते. महागाई वाढवून गोरगरिबांचे जगणे कठीण केले आहे. याचा जोरदार फटका भाजपला बसला आहे.

सर्व खेड्यापाड्यातील मतदारांनी जी निवडणूक आपल्या हातात घेतल्याने भाजपाचे स्टार परचारक तथा देखाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची यवतमाळ व चंद्रपुरात सभा घेण्यात आल्या परंतु या सभेत मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावर भाष्य केले नाही. तसेच मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील सभेत बहीण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारे वक्तव्य केल्याने महिला मतदारांमध्ये  प्रचंड नाराजी पसरली होती. त्यामुळे नारीशक्ती एक वटली व त्यांनी भाजपच्या कोणत्याही खोट्या आश्वासनाला बळी न पडता शेतकरी, ओबीसी विरोधी भाजपला बुरखा मतदारांनी टराटर फाडला आहे

येणाऱ्या वणी विधानसभेतही भाजला बसणार धक्का

लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र बघता वणी विधानसभेत देखील भाजपला जोरदार धका बसण्याचे संकेत या निमित्याने मिळत आहे. ज्या पद्धतीने लोकसभेत महाबिकास आघाडीला मतदान मिळाले आहे. तेच वातावरण टिकून राहिल्यास सत्तेतील भाजपला जोरदार धक्का बसणार असल्याची चर्चा आजच रंगू लागल्या आहेत.