Ticker

6/recent/ticker-posts

मनसेने राखली भाजपाची थोडीफार आब्रु

 

वणी विधानसभेत महाविकास आघाडीचे पारडे जड

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे देऊळ बुडत्या डोहात

News Today 

दिलीप भोयर

वणी :- नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निकालाने येत्या विधानसभेचे गणित जुळायला सूरवात झाली आहे. वणी विधानसभेत महाविकास आघाडीला भरभरून मतदान पडल्याने विद्यमान आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांचे देऊळ आता बुडत्या डोहात दिसायला लागले आहे. संपन्न झालेल्या या निवडणुकीत मनसे थोडीफार भाजपची आब्रू रखल्याची चर्चा मात्र सर्वत्र रंगून येत आहे.

वणी विधानसभेत महाविकास आघाडीचा प्रचंड बोलबाला दिसून आल्याने अनेक हवेसे गवस्यांना विधानसभेतून निवडणूक लढायचे स्वप्न पडायला लागले आहे. आणि ते साहजिकच आहे. कारण या निवडणुकीचा निकालच या पद्धतीचा लागला आहे. ज्या प्रमाणे मोदी लाट सन २०१४ व २०१९ मध्ये उसळली आहे. त्याच्या दुप्पट मोदी आणि भाजपा विरोधी लाट उभी झाली आहे. मोदीच्या भरोष्यावर निवडणुका जिंकता येतात असा गोड गैरसमज ज्या ज्या भाजपाच्या नेत्यांना होता त्या स्वप्नंची आता राख रांगोळी झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ महाराष्ट्र  नवं निर्माण सेनेने पकडल्याने थोडा फार दिलासा मतांमध्ये दिसून आला आहे. 

वणी विधानसभेतील राजू उंबरकर हे एक नाव देखील सर्वत्र परिचयाचे आहे. मनसे भाजप सोबत जुळली तर मतांमध्ये खूप मोठा बदल होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु चक्क भाजपचेच मतदार मात्र महाविकास आघाडीकडे वळल्याने भाजपची चांगलीच गोची झाली आहे. 

वणी विधानसभा क्षेत्रात एकूण २ लाख ४ हजार ७९४ इकडे मतदान झाले आहे. यात महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना सर्वाधिक १ लाख २५ हजार ७८१ तर भाजपाचे पराजित उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना ६९ हजार १३३ येवढे मतदान झाले आहे. यातील इतरांना व नोटा यांना नाममात्र मतदान  आहे. यातून भाजपच्या पडलेल्या ६९ हजार १३३ मतांपैकी मनसेचे २२ ते २५ हजार मतदान वजा केले तर केवळ ४० ते ४५ हजार मतदान भाजपच्या पदरात पडले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा जर भाजपने स्वतंत्र लढल्या तर आमदार संजयरेडी बोदकुरवार यांचे देऊळ आपसुक्या बुडत्या डोहात जाण्याचे चित्र दिसून येत असल्याची चर्चा आता गावागल्लीत होत असली तरी मनसेने थोडी फार आब्रू मात्र राखली हे निर्विवाद दिसून येत आहे. जर मनसे सोबत नसती तर भाजपाची पूर्ण दानादान उडाली असती असे मत काही राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.


शेवटी वाण्या - बामणाच्या पक्षाला बहुजनांनी धूळ चारली

भारतीय जनता पार्टी ज्यावेळी स्थापन झाली होती त्यावेळी या पार्टीला वान्या बामनाची पार्टी म्हणून ओळखल्या जात होत. या पार्टीने स्व. गोपीनाथजी मुंडे, एकनाथराव खडसे, विनोद तावडे  आदी बहुजनातील चेहरे समोर करीत तत्कालीन शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे बोट पकडुन महाराष्ट्र राज्यात  आपली राजकीय पोळी भाजायला सुरवात केली. परंतु २०१४ मध्ये उसळलेल्या मोदी लाटेच्या अहंकाराने या पार्टीने सर्व बहुजन नेत्यांचे खच्चिकरण करून शिवसेनेचा देखील जागोजागी अपमान करायला सुरवात केली तेवढंच नाही तर चक्क शिवसेनेचेच दोन गट करून आपसी वाद लावल्याचे आरोप होत आहे. याचाच वचपा महाराष्ट्रातील मराठी बाण्यांनी या वाण्या - बामानाच्या पार्टीला शेतकरी बहुजन (obc,sc, st,vjnt,dnt,) समाजाने चांगलीच धूळ चारली आहे.