Ticker

6/recent/ticker-posts

मोदी आवास घरकुल योजनेचा निधी अभावी दुसरा हप्ता थकीत

 

लाखो लाभार्थ्यांना ऐन पावसात  उघड्यावर राहण्याची वेळ, घरकुलाचे स्वप्न भंग



News Today 

दिलीप भोयर

वणी :- राज्यातील ओबीसी समाजाला वाटप करण्यात आलेल्या मोदी आवास घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्या निधी अभावी थकीत पाडल्याने लाखो लाभार्थ्यांना ऐन पावसाच्या तोंडावर उघड्यावर राहण्याची वेळ राज्य शासनाकडून  आल्याचे आरोप केल्या जात असल्याने शासनाप्रती लाभार्थ्यांमध्ये रोष निर्माण होत आहे.

महाराष्ट्र राज्यातील डबल इंजन सरकारने लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून ओबीसी समाजाला मोदी आवास घरकुल योजनेअंर्तगत लाखो लाभार्थ्यांना १ लाख २० हजार रुपये घरकुलासाठी प्रधान करण्यात आले होते. यातील सुरवातीचा पहिलाहप्ता १५ हजार रुपये सर्व लाभार्थ्यांना अदा करण्यात आल्याने गोरगरीब लाभार्थ्यांनी आपले राहते घर पाडून नवीन घर बांधणीला सर्वात केली. परंतु दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी लाभार्थी पंचायत समितीच्या कार्यालयात चकरा मारत असून त्यांना मात्र निधी अभावी दुसरा हप्तासाठी विलंब होत असल्याने त्यांचे संपूर्ण बांधकाम प्रलंबित पडले आहे. पावसाचे दिवस अगदी तोंडावर आले असताना घरपरिवर घेवून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याचे वेळ सरकारने आणून ठेवल्याने लाभार्थी प्रचंड रोष व्यक्त करीत आहे. 



      घरकुलासाठी १.२० लाख हा अल्पसा निधी

स्वतःच घर असावं हे प्रत्येक गोरगरिबांचे स्वप्न असते. त्यासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब ओबीसींना सरकार कडून घरकुल बांधण्यासाठी मोदी आवास घरकुल योजनेकडून १.२० लाखाचा हा निधी अत्यंत अल्पसा असून यात बांधकाम करणाऱ्या गवंडी कामगारानांचं अर्ध्यापेक्षा जास्त खर्च येत आहे. त्यातल्या त्यात रेती, विटा, सिमेंट  व लोखंडी रॉडचे दर गगनाला भिडले असून घरकुल बांधताना लाभार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. घरकुल म्हणजे नाकापेक्षा मोती जड झाला आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे घरकुल योग्यरीत्या तयार होईल असा निधी देण्यात यावा अशी मागणी होत आहे. कारण घरकुलाच्या हाप्यासाठी चकरा मारण्यात लाभार्थ्यांचे हजारो रुपये वाया जात आहे. मोदी आवास योजनेमुळे नरेंद्र मोदी यांच्या देखील नावाला काळीमा फासणारे कृत्य राज्य सरकार करीत असल्याचे आरोप आता जनतेकडून केल्या जात आहे. 



              लोकसभेत भाजपाचा दारुन पराभव

लोकसभेत मताधिक्य वाढावं या उद्देशाने मोदी आवास घरकुल योजना सरकारने अंमलनात आणली असली तरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकसभेतील भाजप, सेना व रॉका या तिघांची संगळ असताना सुद्धा महाविकास आघाडीला भरभरून यश मिळालं आहे. यात भाजप व मित्र पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. मोदी आवास घरकुल योजनेचा दुसरा हप्ता जर प्रलंबित राहिला तर येत्या विधानसभेतही भाजप व मित्र पक्षाचा पुर्णतः सुकडा साफ होण्याची चित्र उभे होत आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष देवून निधी उपलब्ध करण्याची गरज आहे.