Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाला छत्रपतीच्या प्रतिमेचा विसर, शिवप्रेमीयांमध्ये पसरला रोष

 

शिवराज्यभिषेक दिना निमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर छ. शिवरायांचा फोयोच गायब 

News Today 

प्रतिनिधी

मुंबई :- ज्या छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर महाराष्ट्राची ओळख अख्या जगात आहे. त्याच शिवरायांच्या राज्यभिषेकाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभेच्छा बॅनर्सवरून छ. शिवरायांचा फोटोच गायब असल्याने शिवप्रेमीयांमध्ये प्रचंड रोष पसरला असून महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळातील सांस्कृतिक कार्य विभागाचे डोके फिरले आहे असा आरोप महाराष्ट्रातील मराठी माणसांकडून केल्या जात आहे. 

   मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया जवळ दिनांक १ जून ते ७ पर्यंत ३५० वॉ शिवराज्यभिषेक दिना निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या बॅनर्सवर छ. शिवरायांची प्रतिमा गायब आहे. हा महाराष्ट्र शसणाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून चक्क अपमान झाला आहे. अशी टीका जनतेतून केल्या जात आहे. 



    ६ जून ही तारीख महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील शिवप्रेमी जनतेच्या हृदयात शिवराज्यभिषेक दिन म्हणून कोरून आहे. हा शिवराज्यभिषेक दिन रायगडावर मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा करण्यात येतो आहे. महाराष्ट्र शासनाकडून देखील हा दिवस साजरा करण्यात येतो आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडू हार्दिक स्वागत असे मुंबई येथे  फलक लावण्यात आले आहे. या फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो टाकण्यात आले आहे. परंतु छ्त्रपती शिवरायांचे कुठच चित्र नसल्याने हे बॅनर केवळ स्वतःच्या नावापुरते व स्वतःच्या प्रसिद्धीसाठी लावण्यात आले का असा प्रश्न निर्माण झाला असून शिवप्रेमी जनतेत प्रचंड रोष पसरला आहे.