Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपुरात ना गांधी ना मोदी, ओबीसी (कुणबी) फॅक्टर हीच एक संधी

 

ओबीसींना डावलने, कुणबी महिलेला हिनवने भाजपला पडले महागात

सर्व पक्षीय कोमटी समाजाचा आदर्श कुणब्यांना जपला

News Today

दिलीप भोयर

वणी :- चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी शेतकरी कन्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे. या विजयाला कारणीभुत ना गांधी  ना मोदी तर ओबीसी कुणबी फॅक्टर बघायला मिळाला आहे. भाजपने ओबीसी उमेदवार डावल्याने त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. 


चंद्रपूर लोकसभा मतदार सांगत चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, वणी व आर्णी अश्या सहा विधानसभेचा समावेश असून या भागात सर्वाधिक मतदार जवळपास १२ लाखाचे वर ओबीसी समाजाचे आहेत. त्यातल्या त्यात एका कुणबी समाजाचे जवळपास ६ लाखाच्या वर मतदार आहेत. त्यामुळे या पठ्यात कुणबी फॅक्टर हा निच्छितपणे चालू शकतो हे आता सर्व राजकीय पक्षाला कळून चुकले आहे.  आजपर्यंत कोणत्याही समाजाला सामाजिक भान नसल्याने बोलल्या जात होते. परंतु २०१९ पासून समजिकेतेच्या एकत्री करणाला बळ प्राप्त झाले आहे. लोकसभेत प्रत्येक जाती घटकाच्या प्रतिनिधीत्वाला प्रचंड महत्त्व असते. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत अटीतटीची असते. चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात सर्वाधिक लोकसभेचे प्रतिनिधी हे ओबीसी समाजाचेच निवडून गेले आहे. असा इतिहास असताना भाजप कडून ओबीसी समाजाला डावलून अल्पशा मतांचा समाज असलेल्या आर्य वैश्य कोमटी समाजातील सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात लोकसभेचे उमेदवार म्हणून घंटी बांधण्यात आली होती. याची सल सर्व ओबीसी इतर समाज बांधवांमध्ये दिसून आली. त्यामुळे " अभी नहीं तो कभी नहीं " या म्हणी प्रमाणे सर्व ओबीसी समाज भाजपला आपली जागा दाखविण्यासाठी एकवटला  होता. आणि ओबीसी समाजाने भाजपला आपली जागा दाखवून ऐतिहासिक मतांनी प्रतिभा धानोरकर यांना विजय प्राप्त करून दिला. त्यातल्या त्यात कुणबी समाजाने प्रचंड मेहनत घेवुन सामाजिक फॅक्टर दाखवून दिला त्यामुळे यापुढे ओबीसी आणि कुणबी समाजाला डावल्याने धाडस कोणी करणार नाही असी धास्ती निर्माण केली आहे. "जो हमसे टकरायेगा, ओ मिठ्ठी मे मिल जयेगा" अशी अवस्था तयार झाली आहे. हा धाक केवळ भाजपलाच नाही तर काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षा मध्ये देखील निर्माण झाला आहे. 


भाजप कडून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर होताच कोमटी समाजामध्ये उत्साह निर्माण झाला होता त्याच बरोबर सर्व पक्षातील कोमटी समाज बांधव समाजासाठी एकवटला होता त्या पद्धतीने त्यांनी प्रचार देखील केला. हाच त्यांचा आदर्श कदाचित कुणबी समाजाने घेतला असावा आणि त्यांच्या एकत्र करणाचे बळ पाहून कुणबी ओबीसी समाज देखील आपले बळ दाखवत प्रचार करू लागला व इतिहास विजय प्राप्त केला. 

प्रतिभा धानोरकर ही एक महिला असून ती एका शेतकऱ्याची मुलगी आहे. त्याच बरोबर त्यांचे पती दिवंगत बाळूभाऊ धानोरकर हे एक आमदार  आणि खासदार झाले होते. त्याच बरोबर ते एक यशस्वी उद्योजक होते. त्यांचे सर्वाधिक व्यवसाय हे शासन परवाना घेवून मद्य विक्रीचे आहे. मद्य विक्रीला समजत जरी स्थान नसले तरी राजकीय क्षेत्रात त्यांची मजबूत पकड होती. व सर्व सामान्य जनतेच्या मदतीला ते धावून जायचे आणि न्याय द्यायचे अन्यायावर तुटून पडायचे एक आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख होती. असे असताना देखील सातत्याने भाजप कडून प्रतिभा धानोरकर यांना डीवचल्या जात होत. एकीकडे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात देखील कोमटी समाजाचे अनेक मद्य विक्रीचे व्यवसाय आहे. परंतु ते त्यांना कधीच दिसले नाही. त्यामुळे ओबीसी कुणबी समाजा मध्ये देखील चांगलाच रोष निर्माण झाला होता. "आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना दणका बसला दाबून" अश्या चर्चेला ऊत येत आहे. यापुढे कोणीही कुणब्यांना किंव्हा ओबीसींना डीवचल्यास त्यांचा अश्याच प्रकारे बुग्दा पडणार हे मात्र सिद्ध झाले आहे. 

                              भाजपने केलेल्या चुका 

ओबीसी हंसराज अहिर यांचा पत्ता कट करून व्यापारी समाजातील सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करणे, त्यानंतर उमेदवारी जाहीर होताच नागपूर विमानतळावर आमचे सुधीरभाऊ म्हणून केवळ कोमटी समाजाच्या महिलांनी सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून त्यांची केलेली ओवाळणी, मोदीच्या सभेत अहिरांना मनोगतपासून रोखणे, चक्क सुधीर मुनगंटीवार यांनी  बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारे वक्त्यव  केल्याने महिलांमध्ये स्वतःहून रोष पसरवणे, मोदींनी आपल्या सभेत शेतकऱ्यांच्या शेतमालाबद्दल गप्प बसणे, ओबीसी कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवणे, भ्रष्टाचाराला खतपाणी घालने, बेताल व्यक्त्यव करून दिश्या भरकटवणे, कुणबी (ओबीसी) महिलेला डीवचने, हुकूमशाही सारखे वागणे, शेतमालाचे भाव पाडणे आदी कारणे समोर आले आहेत.

     


      

              या विधानसभा क्षेत्रात घडणार बदल

लोकसभेत माहविकास आघाडीचा डंका वाजला असल्याने विदर्भात देखील मोठा बदल घडला आहे. त्याच बरोबर येत्या विधानसभा निवडणुकीत देखील चांगला बदल घडणार असून ओबीसी फॅक्टर चालणार आहे. त्यामुळे वणी, वरोरा, चंद्रपूर, राजुरा, आर्णी, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत चांगला बदल दिसून येण्याची शक्यता निर्माण झाल्याने अनेक आमदारांची धाकधूक वाढली आहे.